जिंदगी कैसी है पहेली


न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
गुन्हा घडण्याआधीच आता समजणार
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर

 

लंडन
जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांमध्ये गुन्हेगारीची समस्या त्रासदायक होत चालली आहे गुन्हेगारांच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने हे गुन्हे रोखायचे कसे याचे आव्हान सर्वच पोलिसांना असते पण आता ब्रिटन सरकारने आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून एक अशी यंत्रणा तयार केली आहे ज्यामुळे प्रत्यक्ष गुन्हा घडण्यापूर्वीच त्याची माहिती पोलिसांना मिळणार आहे 2002 मध्ये स्टीव्हन स्पिलबर्ग याच्या मायनॉरिटी रिपोर्ट नावाच्या एका चित्रपटामध्ये या प्रकारची संकल्पना वापरण्यात आली होती ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे ब्रिटन पोलिसांनी या प्रोजेक्टला सीडीएपी असे नाव दिले आहे गेल्या तीन वर्षापासून या प्रोजेक्टवर प्रयोग सुरू असून त्याला आत्तापर्यंत यश मिळाले असे दिसत आहे या संकल्पनेच्या येत्या काही कालावधीमध्ये आणखीन काही चाचण्या करण्यात येणार असून येत्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये हे तंत्रज्ञान ब्रिटिश पोलीस प्रशासनामध्ये वापरण्यात येणार आहे या संकल्पनेवर जेव्हा प्रयोग सुरू होते तेव्हा लंडन आणि उपनगरातील वाहतुकीच्या माहितीच्या आधारे इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस ग्रामीण भागातील अमलीद्रव्यचा व्यापार करणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले होते एका विशिष्ट कंपनीकडून ठराविक दिवशी मोटारी भाड्याने घेण्याच्या घटना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने उघडकिस आणल्यानंतर पोलिसांना त्याबाबत शंका आली त्यानंतर त्यांनी अधिक तपास केला असताना यामध्ये अमली पदार्थाचा व्यापार गुंतल्याचे लक्षात आले या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करण्यात आला तर संशयास्पद व्यवहार आणि संशयास्पद हालचाली यांची माहिती आधीच टिपण्यात यश येणार आहे आणि त्यामुळे भविष्यातील गुन्हेगारीवरही नियंत्रण ठेवता येणार आहे

 

 

न्यूजमंडी/ज्ञानकोश
निवडणूक खर्च

खर्चावर कसे लक्ष ठेवले जाते?
उमेदवाराने निवडणूक काळात केलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणेकडून लक्ष ठेवले जाते. यामध्ये निवडणूक खर्च अधिकाऱ्यांच्या अख्यत्यारीत राज्यातील विविध यंत्रणा कार्यरत असतात. त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर, विक्रीकर अधिकारी, आयकर विभागातील अधिकारी, भरारी पथक, यासह स्वतंत्र व्हिडिओ रेकॉर्डिग पथक, लेखा अधिकारी, बूथ स्तरीय जनजागृती पथक यांच्या माध्यमातून खर्चावर लक्ष ठेवले जाते. यामध्ये निवडणूक खर्च अधिकाऱ्यांची प्रमुख भूमिका आहे. निवडणूक खर्च निरीक्षकाच्या निगरणाखाली उमेदवाराच्या दैनदिन खर्चाचे परिक्षण केले जाते. यासाठी उमेदवारांनी संपूर्ण निवडणूक काळात किमान तीन वेळा निवडणुकीतील खर्चाचे रजिस्टर निवडणूक खर्च निरीक्षकांकडे पडताळणीसाठी देणे आवश्यक आहे.उमेदवाराला निवडणुकीत झालेल्या खर्चाची माहिती द्यायची असली तरी ती ढोबळ मानाने आकडेवारी देता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून त्यावरही काही निर्बंध आणले आहेत. जर किरकोळ रक्कम खर्च झाली असेल आणि जिथे चेक न देता रोख रक्कम देण्यात आली असेल त्या ठिकाणी उमेदवाराने खर्चाचे व्हाऊचर जोडणे अनिवार्य आहे. याशिवाय निवडणूक आयोगाकडून काही सेवा वस्तूच्या किंमती निश्चित केल्या आहेत.त्यानुसार उमेदवाराला आपल्या खर्चाचा तपशील देणे बंधनकारक राहणार आहे.

Advertisement

 

न्यूजमंडी/सुविचार
१. आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा.

२. जर पळून पळून थकला असेल तर चालत राहा पण थांबा तेव्हाच जेव्हा तुमी तुमचे लक्ष्य गाठाल.

३. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल. मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्गा नक्कीच मिळेल

 

 

न्यूजमंडी/विनोद

नेट
बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते…
मैत्रीण – मग काय केले…?
बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने…

सांत्वन
बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.
नवरा – नाही गं.
बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल…

गजनी
नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…इश्श…
नवरा – आई शप्पथ…जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना, तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…

 

 


न्यूजमंडी/खाद्ययात्रा
व्हेज सोया पुलाव

साहित्य
मेजरींग कप सोयाबीन वडी फुलकोबी गाजर . बटाटा . 1/2 मेजरींग कप मटार 2 टीस्पून तिखट 1 टीस्पून धने पूड
1 टीस्पून पुलाव मसाला 1 इंच तेजपान 2 टीस्पून लसूण जीरे पेस्ट 1/3 टीस्पून हळद \चवीनुसार मीठ

कृती

प्रथम सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन चिरून घेणे .नंतर बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे .नंतर एका भांड्यात गरम पाणी करून सोयाबीन वडी वाफवून घेणे .नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून तेजपान कढीपत्ता घालून कांदा लसूण जीरे पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड, टमाटर घालून परतून घ्या .नंतर सर्व भाज्या, धुऊन घेतलेले तांदूळ घालून परतून थोडावेळ झाकून ठेवा .नंतर त्यात गरम पाणी सोयाबीन वडी घालून परतून घ्या नंतर मंद आचेवर शिजू द्या सोयाबीन व्हेज पुलाव तयार झाल्यावर कढी, मठ्ठा सोबत डीश सर्व्ह करा

 

 

न्यूजमंडी/भविष्य
मेष आजचा दिवस उत्साहाने मजेत व्यतीत करा.

वृषभ प्रसन्न चित्ताने व निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडा.

मिथुन आजच्या दिवसाचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती करणे आवश्यक राहील.

कर्क विनाकारण वाद-विवाद, कटकटी यासारखे प्रसंग टाळा.

सिंह आज उत्तम दांपत्य सौख्याची प्राप्ती कराल.

कन्या आजच्या दिवशी अनावश्यक गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. आपले काम भले आणि आपण भले ही भूमिका ठेवणे योग्य राहील.

तुळ आपल्या काही सुप्त कलागुणांसाठी आज वेळ काढाल.

वृश्चिक माहेरच्या मंडळींचा सहवास लाभू शकतो.

धनु कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल.

मकर आज काही धनप्राप्तीचे योग देखील संभवतात.

कुंभ काही नवीन कामे हाती घ्याल. त्यासाठी उत्साहाने नियोजन कराल.

मीनआज हिशोबी वृत्तीने वागणे श्रेयस्कर ठरेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!