गुरुवार २२ मे रोजी मासिक संगीत सभा
शास्त्रीय गायन आणि गिटार अकादमीच्या कलाकारांचे सादरीकरण
सातारा
ऍड अमित द्रविड यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरु झालेल्या आगळ्या वेगळ्या संगीत उपक्रमात मे महिन्यातील मासिक संगीत सभा गुरुवार २२ मे रोजी सायंकाळी 6 वाजता द्रविड ऑफिस, गुरुवार पेठ, सातारा येथे रंगणार आहे
या संगीत सभेच्या प्रथम सत्रात शास्त्रीय गायन वैभव फडतरे सादर करणार असून त्यांना हार्मोनियमवर कु. स्वरा किरपेकर आणि
तबल्यावर मिलिंद देवरे साथ देणार आहेत
द्वितीय सत्रात द ब्लू नोट गिटार अकादमी साताराच्या कलाकारांचे सादरीकरण होणार आहे त्यामध्ये प्रतीक सदामते, विजय साळुंखे, अनुजा बोकील, आर्यन उतेकर, सारंग ठोंबरे, यश केंजळे, रुद्र सपकाळ, सेल्वी सेजवळकर, रितिका मोरे, अमित जाधव हे कलाकार सहभागी होणार आहेत
सातारकर रसिकांनी या संगीत सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन ऍड अमित द्रविड यांनी केले आहे