वार्षिक राशिभविष्य 2025 :धनु


वार्षिक राशिभविष्य 2025 
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

Advertisement

धनु
आव्हानात्मक तरीही उत्तम
धनु राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष थोडं आव्हानात्मक असले तरीही उत्तम जाणार आहे धनु राशीचा राशी स्वामी गुरु वर्षाच्या सुरुवातीला बकरी असून तो वृषभ राशीत म्हणजेच सहाव्या स्थानात असेल जानेवारी महिन्यात काहीजण परदेश यात्रा करतील ज्यांचा प्रदेशात व्यवसाय किंवा व्यापार आहे त्यांचा व्यवसाय वाढवतील आयटी आणि इंजीनियरिंग क्षेत्रातील व्यवसायिक प्रदेशात चांगला जम बसतील धनु राशीच्या व्यक्ती ज्या विज्ञान क्षेत्रात संशोधन करतात त्यांना यावर्षी नवीन संशोधन करण्यात यश मिळेल धनु राशीसाठी शनीचे भ्रमण शुभ होते परंतु 29 मार्चपासून धनु धनु राशीची ढईय्या सुरू होईल ही ढईय्या 29 मार्च 2025 ला सुरू होऊन 3 जून 2017 पर्यंत चालेल त्यामुळे शत्रू वाढतील शत्रूंचा त्रास वाढेल आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर आजार वाढतील काही व्यक्तींचे जोडीदाराशी संबंध बिघडतील कौटुंबिक कलह वाढतील आर्थिक प्रगतीमध्ये अडचणी येतील 14 मार्च 2025 रोजी गुरु ग्रहाचे गोचर मिथुन राशीतून होईल गुरुचे भ्रमण तुमच्या सप्तम स्थानातून होईल हे गोचर तुमच्यासाठी शुभ राहील गुरुच्या शुभ प्रभावामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल त्यामुळे तुमची प्रगती चांगली होईल तुमचे काम आणि प्रभाव यामुळे उच्च अधिकारी तुम्हाला जास्त अधिकार देतील नोकरीत पदोन्नती होईल व्यापारातही प्रगती होईल धनप्राप्ती अनेक मार्गाने होईल विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश मिळवतील यावर्षी धनु राशीचे लोक आपल्या बुद्धीने प्रकाशात येतील नवीन वाहन खरेदी कराल कुटुंबात भावंडांचा विवाह संपन्न होईल धनु राशीच्या काही व्यक्तींना देशातील उच्च सन्मान मिळेल राज्यस्तरावर आणि सामाजिक स्तरावर धनु राशीच्या काही व्यक्तींना मानसन्मान मिळेल सामाजिक क्षेत्रातही आपल्या कामामुळे धनु राशीच्या काही व्यक्ती लोकांमध्ये प्रिय होतील जानेवारी एप्रिल मे महिन्यात प्रेम संबंध बिघडू शकतात जानेवारी एप्रिल आणि मे महिन्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका नाहीतर नुकसान होऊ शकते ॲनिमिया अस्थिभंग जखम होणे त्यात इन्फेक्शन होणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे 30 मे 2025 रोजी राहू आणि केतूचे गोचर कुंभ आणि सिंह राशीतून होईल राहूचे गोचर तिसऱ्या स्थानातून तर केतूचे गोचर भाग्य स्थानातून होईल तिसऱ्या स्थानातील राहू चा प्रभाव शुभ असतो तुमच्या पराक्रमात वाढ होईल राजकारणात यश मिळेल घरात घरात समृद्धी येईल भाग्यस्थानातील केतूमुळे तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींपासून दूर होण्याची इच्छा होईल पण धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य करत रहा राहूमुळे लहान भावनांशी मतभेद होतील धनु राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी एप्रिल मे आणि नोव्हेंबर हे महिने आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!