बारावीचा निकाल मंगळवारी १ वाजता
पुणे:
मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in
२. https://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org
डिजीलॉकर मध्ये गुणपत्रिका संग्रहीत करता येणार
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
