काळानुसार व्याख्यानमालांचे स्वरूप बदलावे :डॉ राजेंद्र माने


ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ

Advertisement

सातारा
व्याख्यानमाला अत्यंत महत्वाच्या आहेत .पण काळानुसार व्याख्यानमालांचे स्वरूप बदलते राहायला पाहिजे अशी अपेक्षा साहित्यिक डॉ राजेंद्र माने यांनी व्यक्त केली
ज्ञानविकास मंडळाच्या ५२ व्य वसंत व्याख्यानमालेला सातारा येथे प्रारंभ झाला तेव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
डॉ राजेंद्र माने म्हणाले,ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेनं सातारकरांचं वैचारिक भरणपोषण केलं गेली बावन्न वर्षात महाराष्ट्रतले सर्वक्षेत्रातले मोठ मोठे वक्ते या व्यासपीठावर येवून गेले . राजकीय , सामाजिक ,साहित्यिक , कला, क्रिडा सर्व क्षेत्रातल्या विषयावर इथे विचारमंथन घडले . ही समृद्धी खूप मोठी
आहे कारण यात सर्व सामावेशकता आहे . रंजकता आणि प्रबोधन यांची संलग्नता यात राहिलेमुळे हे सातत्य टिकून आहे . वि ल चाफेकरांचा हा वसा आणि वारसा प्रसाद चाफेकर पुढे चालवत आहेत .
काळानुसार व्याख्यानमालांचे स्वरूप बदलते राहायला पाहिजेत तसेच वेगवेगळे प्रयोग आता होत आहेत . नविन तरुण पिढीतला प्रेक्षकवर्ग व्याख्यानमालांच्या कडे वळणेही महत्वाचे आहे . मुलाखत, अभिवाचन, व्याख्यान , संगीत असे विविध कार्यक्रम काळानुसार यात सामाविष्ट व्हायला पाहिजेत . तसे इथे घडत आहे त्यामुळे लोकांची पावले व्याख्यानमालांकडे वळत राहतील,असेही ते म्हणाले
व्याखानमालेच्या पहिल्या पुष्पात डॉ अदिती काळमेख,वैदेही कुलकर्णी ,अजय गिजरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांच्या दोन कथांचे अभिवाचन केले.मानवी भावभावनांचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या या कथांना श्रोत्यांनी प्रतिसाद दिला

फोटो ओळ
डॉ अदिती काळमेख,वैदेही कुलकर्णी ,अजय गिजरे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!