सोमवारी साताऱ्यात हिंदी गीतांचा कार्यक्रम


सातारा
गीत गाता चल कराओके ग्रुप सातारा आणि दीप लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी ५-३० वाजता मुकेश रफी किशोर लता आशा या फाइव स्टार सिंगर थीम वर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमात गीत गाता चल ग्रुप चे २५ सदस्य आपली गायन कला सादर करणार आहेत. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नितिन देशपांडे,मुकुंद फडके, श्रीकांत कात्रे, श्रीराम नानल, विनायक भोसले आणि शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाची निर्मिती ही संजय माणके यांची असून संयोजन हे प्रशांत कुलकर्णी यांचे आहे. सदर कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व सातारकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!