जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे आयोजन
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या साहित्याचा आढावा घेणारा ‘जयवंत दळवी : कालचक्रावर स्वतःची मोहर उमटवणारा लेखक ‘ हा डॉक्टर अदिती काळमेख यांची संकल्पना व संहिता असणारा कार्यक्रम सादर करण्यात आला .
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून जयवंत दळवी यांच्या ग्रंथसंपदेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या विविध साहित्य प्रकाराचे अभिवाचन डॉक्टर आदिती काळमेख ,वैदेही कुलकर्णी, अजय गिजरे, मिलिंद कांबळे व धनश्री भिडे यांनी केले.
जयवंत दळवी यांच्या नातीगोती या नाटकातील अंश, त्याचबरोबर दळवींनी लिहिलेल्या ‘ परममित्र ‘ या पुस्तकातील जीए कुलकर्णी यांच्यावरील लेख ,ठणठणपाळ या सदरातील लेख, त्याचबरोबर ‘बोका ‘ ही विनोदी कथा अशा विविध साहित्य प्रकाराचे अभिवाचन करण्यात आले .
या सर्व साहित्य प्रकाराच्या माध्यमातून जयवंत दळवी यांच्या विविध अंगी साहित्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न उत्तम प्रकारे या कार्यक्रमामधून संपन्न झाला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांनी करताना ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला
प्रारंभी सर्व मान्यवर अभिवाचन करणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले .
पद्माकर पाठकजी यांनी आभार व्यक्त केले .
कार्यक्रमास अध्यक्ष अजित कुबेर , बानुबी बागवान ,डॉक्टर मोहन सुखटणकर, सागर गायकवाड ,गौतम भोसले,वसंत शिंदे,आर डी पाटील , कविता प्रभुणे , अमित काळमेख , चंद्रकांत कांबीरे , डी एस कुलकर्णी, ओंकार पाटील,पल्लवी देवरे , रुपा मुळेवगैरे मान्यवर उपस्थित होते .

