क्रिकेट नियमांमध्ये मोठा बदल
सामन्याच्या निकालावर होऊ शकतो परिणाम
वॉशिंग्टन
क्रिकेटप्रेमींना T20 वर्ल्ड कपची प्रकिक्षा लागली आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ICC ने मेगा इव्हेंटसाठी नवीन नियम जारी केले आहेत.
या नियमांचा थेट सामन्याच्या निकालावर परिणाम होणार आहे.
स्टॉप क्लॉक नियमानुसार बॉलिंग करणाऱ्या संघाला एक ओव्हर पूर्ण झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आत पुढील ओव्हर सुरु करावी लागणार आहे. एखादा संघ असे न करु शकल्यास 5 धावांची पेनल्टी लागू शकते म्हणजे हा नियम मोडल्यास बॅटिंग करणाऱ्या संघाला 5 धावा दिल्या जातील. 5 धावांची पेनल्टी लागण्याआधी अंपायर बॉलिंग करणाऱ्या संघाला दोन वेळा वार्निंग देतील. मात्र तिसऱ्यांदा हा नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. हा नियम पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
T20 वर्ल्ड कपमध्ये वेळेचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. संपूर्ण सामना 3 तास 10 मिनिटांमध्ये संपवावा लागणार आहे. एक डाव पूर्ण करण्यासाठी 1 तास 25 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. मात्र एखाद्या संघाला जास्त वेळ लागल्यास बॉलिंग करणाऱ्या संघाला फटका बसू शकतो. बॉलिंग करणाऱ्या संघाला सर्कलमध्ये एक खेळाडू जास्त ठेवण्याची शिक्षा दिली जाईल. एक डाव संपल्यानंतर 20 मिनिटांचा ब्रेक असणार आहे.
ICC ने रिझर्व डे च्या नियमात बदल केला आहे. पहिल्या सेमीफायनलसाठी आणि फायनलसाठी रिझर्व डे असणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलसाठी रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास सामना खेळवण्यासाठी 4 तास 10 मिनिटे अधिक वेळ दिला जाणार आहे.
एखादी मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर खेळवली जाते. मात्र सुपर ओव्हर टाय झाल्यास जास्त बाउंड्री मारणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जात होते, मात्र 2019 च्या वर्ल्डकप दरम्यान हा नियम वादग्रस्त ठरला होता. आता हा नियम काढून टाकण्यात आला आहे. आता मॅचचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे.
T20 वर्ल्ड कपमधील एखाद्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आल्यास सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावला जाईल. लीग स्टेजमध्ये 5 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाल्यानंतरच हा नियम वापरला जाईल. तर नॉकआउट स्टेजमध्ये 10 ओव्हरनंतर हा नियम वापरला जाईल.
