रहिमतपूरचे सुनील नाना माने यांचे निधन
सातारा
रहिमतपूर येथील सुनील आनंदराव माने ( वय 61 ) यांचे अल्प आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे आई,एक मुलगा, एक मुलगी आहे.
जुन्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, कोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव माने यांचे सुनील हे सुपुत्र होत.सुनील हे परिसरात नाना या टोपणनावाने परिचित होते. कृषी शास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी शासकीय सेवेकडे पाठ फिरवून जाणीवपूर्वक शेती आणि शेतकरी विकासासाठी स्वतःला वाहून घेतले. परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना ठिबक सिंचनाचा त्यांनी सर्वदूर प्रचार केला.
त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक मान्यवर सहभागी झाले होते . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी नगराध्यक्ष संपतराव माने ,अरुण माने , कृषी अधिकारी प्रकाश पवार, विद्याधर बाजारे, उमेश पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

