साहित्य विश्वमंडळाचे कवीसंमेलन उत्साहात संपन्न


सातारा
साहित्य विश्व मंडळाचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन जिल्हा पत्रकार भवन गोडोली या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले
सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यांनी सर्व कवींना काव्यलेखनासाठी प्रेरणा देऊन पुस्तकांचे जीवनातले अनन्यसाधारण महत्व व्यक्त केले. त्यांच्या हस्ते मंडळामध्ये नवनियुक्त केलेल्या सर्व कमिटी सदस्यांना कार्यनियुक्तीपत्रके देण्यात आली.
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी कवींना प्रेरणा दिली.कवी हा समाजातील कार्याचे अवलोकन करून त्याची मांडणी कवितेच्या रूपाने करीत असतो.रवींद्रनाथ टागोर यांनी १९०० या वर्षी बंगाली भाषेत ‘प्रार्थना’ ही कविता लिहिली.ती प्रथमतः नैवेद्य या बंगाली नियतकालिकात प्रसिद्ध झाली.नोबेल साहित्य पारितोषिक विजेत्या गीतांजली या काव्यसंग्रहात ती ३५ व्या नंबरला आहे.अजुनही ही कविता विवेकाची कास धारण्यसाठी जगभर वचली जाते असे नमूद केले.
डॉ. सुभाष वाघमारे प्रभारी संचालक भाषा मंडळ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ यांनी साहित्य विश्‍वमंडळाचे कार्य संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
याबरोबरच माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर,डॉ हेमलता हिरवे , जेष्ठ कवी श्री प्रदिप कांबळे, तसेच प्रा. विश्वास नेरकर, सचिव, ग्रंथालय भारती, नागपूर यांनीही सर्व कवींना उत्तेजन दिले.
विविध भागातून पन्नास कवी काव्य संमेलनासाठी उपस्थित झाले होते. या काव्यसंमेलनासाठी साहित्य विश्वमंडळाच्या अध्यक्षा सौ हेमा पवार -जाधव, श्री सुरेश जाधव ,वैशाली महाडिक, सरोजनी भोसले, श्री दिपक पवार सौ रुपाली गुरव, सरोजनी बनसोडे कांचन सावंत, निलम मोहीते, वसुंधरा निकम, संगीता साळुंखे ,अंजली खंडाईत, श्री प्रवीण घाडगे, श्री महेंद्र रसाळ, विजया देशपांडे, सुरेखा कुलकर्णी, श्री दिलीप महादार ,दीपक क्षीरसागर, स्वाती नष्टे स्वाती गुरव, सुनिता साबळे आदी कवी उपस्थित होते.

Advertisement

फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना प्रसिद्ध कवी हनुमंत चांदुगडे,शिरीष चिटणीस आणि इतर मान्यवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!