कॅरम स्पर्धेत सम्राट लकडे विजेता, रोहित चौगुले उपविजेता


कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद खुला गट स्पर्धा

Advertisement

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे वतीने ‌सावली केअर सेंटर पीरवाडी येथे वातानुकूलित हाॅल मध्ये घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा खुला गटात सम्राट लकडे यांनी गतविजेत्या रोहित चौगुले याला अटीतटीच्या लढतीत सरळ दोन गेममध्ये 13 /12 ,21 /18 अशा फरकाने हरवून मागील प्रभावाचे उट्टे काढून अजिंक्यपद मिळविले.त्याला रोख बक्षीस रूपये 5000 तर उपविजेता रोहित चौगुले यास रोख तीन हजार रुपये.मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या आधी झालेल्या उपांत्य फेरीत सम्राटने इक्बाल बागवान याचा 25 /08 .25/02 या पराभव केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीत मध्ये रोहित चौगुले याने सबज्युनिअर राज्य विजेता 12 वर्षे ओमकार वडर यांच्या मध्ये फार अटीतटीची लढत उपस्थित क्रीडा रसिकांना पहायला मिळाली केवळ अनुभवच्या जोरावर रोहित तिसरा गेम 25 /15 , 17 /24 ,22/17 जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
यावेळी कॅरम असोसिएशनचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव यांनी आपल्या भाषणात ओमकार वडर हा काही वर्षांत भारतीय कॅरम संघाचे नक्कीच प्रतिनिधित्व करेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी तृतीय क्रमांकाचे रोख दोन हजार चे बक्षिस इक्बाल बागवान यांनी मिळविले चतुर्थ क्रमांकाचे ओमकार वडर याने रूपये
1000 मिळविले.यावेळी एकून आठजण पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावली केअरचे प्रमुख किशोर देशपांडे, यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नवी मुंबई ( ठाणे) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी खालील कॅरमपंटू ची निवड असोसिएशनचे सदस्य
प्रा.विराज जाधव यांनी जाहीर केली.
पुरुष खुला गट
सम्राट लकडे, रोहित चौगुले, इक्बाल बागवान, ओमकार वडर, अख्तर शेख, मंजूर शेख
प्रौढ गटामध्ये
शिवशंकर भस्मे, संतोष देशपांडे ‌प्रोढ महिला मध्ये राष्ट्रीय विजेत्या शोभा कामत तर महिला गटात ऐश्वर्या पाटील.हे कोल्हापूर जिल्हा कॅरम संघाचे प्रतिनिधित्व करतील.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच सुर्यकांत पाटील, बोर्ड रेफरी म्हणून नामदेव टमके, शशीकांत कोल्हे राजू वडर, मंजूर शेख यांनी काम केले. या स्पर्धेचे नियोजन सावली केअर सेंटर चेतन, अर्जुन,कुणाल, योगेश,‌संग्राम कांबळे ॠषीकेश देशपांडे यांनी केले.
कॅरम बोर्ड व्यवस्था अख्तर शेख, यांनी केली. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा.विराज जाधव यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!