सातारा प्रीमियर क्रिकेट लीगचे सदरबझार संघास विजेतेपद
सातारा,
सदर बझार क्रिकेट संघाने सागर पावशे पुरस्कृत संघावर ५८ धावांनी विजय मिळवून सातारा प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.शाहू क्रीडा संकुल येथे सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने प्रोफेशनल क्रिकेट अकादमी यांनी आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील टी २० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सदर बझार संघाने २० षटकात 5 बाद १७८ धावा केल्या.कर्णधार निरंजन भोसले याने ३ षटकार,7 चौकार मारत 43 चेंडूत ८४ धावा केल्या.सागर पावशे संघ २० षटकात4 बाद १२२ धावा करू शकला.अर्थ पाटील याने एकाकी झुंज देत ८६ धावा केल्या.
निरंजन भोसले याने सामनावीर पुरस्कार मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून प्रथमेश कदम,फलंदाज म्हणून इंद्रनील जाधव,गोलंदाज म्हणून सोहम मोहिते,क्षेत्ररक्षक म्हणून आर्यन धोत्रे यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. बक्षीस समारंभ सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निशांत गवळी,क्रिकेट पंच, पत्रकार शरद महाजनी,नगरसेवक सागर पावशे यांच्या हस्ते झाला.यावेळी सचिव इर्शाद बागवान, राजू जाधव,प्रशांत साळुंखे,प्रमोद जाधव,हेमंत गुजर,भालचंद्र निकम,धनू जाधव,किरण जावळे,राहुल धुमाळ,क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
फोटो ओळ
विजेत्या संघाला ट्रॉफी देताना शरद महाजनी,निशांत गवळी,सागर पावशे,शेजारी राजू जाधव,इर्शाद बागवान,प्रशांत साळुंखे,हेमंत गुजर,भालचंद्र निकम

