शंकरशास्त्री अभ्यंकर,अतुलशास्त्री भगरे यांची आज व्याख्याने
परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव निमित्ताने ब्रह्मोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विद्यावाचस्पती ह भ प शंकरशास्त्री अभ्यंकर आणि वेदाचार्य अतुलशास्त्री भगरे यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे
आज गुरुवार दिनांक 1 मे रोजी सायंकाळी चार वाजता शाहू कला मंदिर येथे ही व्याख्याने होणार आहेत यावेळी अखिल ब्राह्मण महासंघाच्या ब्रह्मतेज या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी आणि संचालक मंडळ यांनी केले आहे

