रवींद्र बेडकीहाळ यांचा शनिवारी सत्कार


सातारा
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष तसेच जेष्ठ पत्रकार व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ यांच्या  कार्याचा गौरव म्हणून मावळा फाउंडेशन आणि सातारा जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, पत्रकारांतर्फे त्यांचा शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सत्कार करण्यात येणार आहे
रवींद्र बेडकीहाळ यांनी केलेली साठ वर्षाची पत्रकारिता व त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य तसेच त्यांनी पोंभुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे उभारलेले स्मारक या त्यांच्या सर्व कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह सुनिता राजे पवार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!