पुणे वसंत व्याख्यानमालेत मुकुंद फडके यांचे व्याख्यान
विवाह समुपदेशन आजची गरज या विषयावर साधणार संवाद
सातारा
पुणे वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने 21 एप्रिलपासून वसंत व्याख्यानमालेला सुरूवात झाली असुन या व्याखानमालेत ज्येष्ठ पत्रकार संपादक न्यूजमंडी पोर्टलचे संपादक मुकुंद फडके पुष्प गुंफणार आहेत शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी टिळक स्मारक मंदिर येथे ते विवाह समुपदेशन आजची गरज या विषयावर बोलणार आहेत
मुकुंद फडके यांनी विविध वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केले असून सध्या ते व्यवस्थापन महाविद्यालयात अध्यापन करत आहेत चित्रपट साहित्य अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी व्याखाने दिली असून विपुल लेखन केले आहे

पुणे वसंत व्याख्यानमालेचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. ही व्याख्यानमाला 20 मे पर्यंत चालणार आहेदररोज सायंकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिरात होईल. या ज्ञान सत्रात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. शंकर अभ्यंकर, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका डॉ. निलीमा गुंडी, रंगभूमीचे अभ्यासक प्रसाद वनारसे, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे, मंगला गोडबोले, डॉ. आदित्य अभ्यंकर, सुलभा तेरणीकर कर्नल अनिल आठले, डॉ. वर्षा तोडमल यांची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेत साहित्य, समाजकारण, संस्कृती, इतिहास, कायदा, जागतिक रंगभूमी, चित्रपट, आर्थिक, आरोग्य आदी विषयांवर विविध ज्येष्ठांचे विचार श्रोत्यांना ऐकता येणार आहेत.

