प्रत्येक विषयात ३५ गुण


पुण्यातील विद्यार्थ्यांचा असाही विक्रम
पुणे
सोमवारी राज्यातील दहवीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याच्या एका विद्यार्थ्याला सर्व विषयात ३५ गुण मिळाले आहेत. प्रथमेश तुपसौंदर असे या मुलाचे नाव असून तो टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत 95.81 टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून या विभागातील ९९.०१ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.७३ इतका आहे. या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना पुण्यातील हा विद्यार्थी चर्चेत आला आहे.
पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश तुपसौंदर याला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाले आहेत. प्रथमेशला ५०० पैकी १७५ गुण मिळाले आहेत. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल सायन्स अशा सर्व विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!