अष्टगंधारमध्ये मंगळवारी आशा भोसले


दीपलक्ष्मी आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुपचा उपक्रम

Advertisement

सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग चौथा हा दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतीक हॉल येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम महान गायिका आशा भोसले यांच्या गाण्यांवर आधारित आहे. तसेच रॉयल म्युझिकल इव्हेंट्सच्या सौ. अपर्णा गायकवाड हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय साबळे, डॉ कामिनी पाटील, गुलाब सावंत, सौ. संगीता हेंद्रे, दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. सौ. अपर्णा गायकवाड यांचे सोबत रॉयलचे इतर गायक त्यांना साथ सांगत देणार आहेत.
तरी ह्या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मी चे चेअरमन शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!