सातारच्या मातीतून मी निर्माण झालो-सयाजी शिंदे


साहित्य कला विकास प्रतिष्ठानतर्फ ज्येष्ठ कलावंत पुरस्कार प्रदान

Advertisement

सातारा
माझी सगळी जडणघडण या सातारच्या मातीतून निर्माण झाली आहे. माझ्या गुरूंनी माझ्यावर योग्य संस्कार केले .माझ्या आईने, इथल्या नाट्य क्षेत्रांने मला घडवलं त्यामुळे इथपर्यंत प्रवास करता आला,असे उद्गार .प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढले
साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारातर्फ प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांना ज्येष्ठ कलावंत पुरस्कार प्राचार्य अशोक भोईटे
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी डॉ शिवाजी शिंदे सोलापूर यांना संशोधक पुरस्कार व सूर्यकांत गुंजवटे यांना ग्रंथशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ डी व्ही देशपांडे , कार्यवाह डॉक्टर यशवंत पाटणे ,डॉक्टर राजेंद्र माने,प्रदीप कांबळे,सुनिता कदम उपस्थित होते
मनोगत व्यक्त करताना सयाजी शिंदे म्हणाले पुढे म्हणाले,वृक्ष आपल्याला खूप काही देतात. हे देणं आपण वृक्षांच्या लागवडीतून समाजाला परत करायला हवं .प्रत्येक माणसाने किमान 60 तरी वृक्ष लावायला हवेत तर पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जगू शकेल.साहित्य कला प्रतिष्ठानने जो गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर अशोक भोईटे म्हणाले ‘लोकसाहित्यातून आणि लोकसंस्कृती मधून निर्माण झालेल्या साहित्य आणि कलावंत दोन्हीही संपन्न असतात .मातीतून निर्माण झालेले लोकसाहित्य हे माणसाला सजग बनवत असते.अभिनेते सयाजी शिंदे यांनी झुलवासारख्या नाटकांमधून सुरुवात करून 11 भाषेमध्ये अभिनयात आपली छाप उमटवली आहे तरीसुद्धा स्वतःच्या मातीशी असणार नातं त्यांनी जपलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे .समाजाप्रती आपलं काही देणं असतं या भूमिकेतून देवराई निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प खूप काही शिकवणारा आहे .सयाजी शिंदे ही सातारची शान आहे. ‘यावेळी डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सयाजी शिंदे यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले व सातारच्या मातीतला हा एक हिरा आहे ज्याला खऱ्या अर्थाने समाजभान आहे .माणसाने गुरुजनाप्रति आपले ऋण व्यक्त केले पाहिजे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण यांच्या विद्यार्थ्यानी या प्रतिष्ठानची निर्मिती केली त्यांच्या स्मृत्यर्थ गेले चोवीस वर्ष हे पुरस्कार प्रदान केले जातात .असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रदीप कांबळे यांनी डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या सन्मानपत्राचे वाचन करून त्यांचे मनोगत व्यक्त केले
सुनिता कदम यांनी सूर्यकांत गुंजवटे यांच्या सन्मान पत्राचे वाचन केले
डॉक्टर राजेंद्र माने यांनी प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ कलावंत पुरस्कारामागची साहित्य कलाविकास प्रतिष्ठानची भूमिका स्पष्ट केली
डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रति अभिवंदना व्यक्त केली या प्रतिष्ठानने दिलेला पुरस्कार हा पुढील साहित्य कारकीर्दीला बळ देणारा ठरेल असे मत व्यक्त केलेसूर्यकांत गुंजवटे यांनी प्रतिष्ठान प्रति ऋण व्यक्त करून त्यामुळे ग्रंथाविषयी पुढील चळवळीत काम करताना बळ मिळेल असे मत व्यक्त केले
डॉक्टर डी व्ही देशपांडे यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने कवी मुक्तेश्वर यांच्यावर लिहिलेल्या प्रबंधासाठी सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ . स्मीता पोरे यांनी केले .
आभार सहकार्यवाह सुनिता कदम यांनी मानले
या कार्यक्रमाला डॉक्टर सुधाकर बेंद्रे डॉक्टर अजय देशमुख सचिन प्रभुणे आनंदा ननावरे , गौतम भोसले व नाट्य क्षेत्रातील रंगकर्मी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!