अष्टगंधार मालिकेत तिसरे पुष्प लतादीदींवर


१५ एप्रिलला आशा भोसले यांची गाणी होणार सादर

Advertisement

सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग तिसरा स्व. लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित होता. रॉयल म्युझिकल इव्हेंट्सच्या पुनम धुमाळ यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुजाता नावंधर व दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. पुनम धुमाळ यांचे सोबत रॉयलचे इतर गायकांनी त्यांना साथ संगत दिली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपली गायन कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
ह्यावेळी बोलताना सौ. सुजाता नावंधर यांनी अष्टगंधार ह्या मालिकेचे तसेच रॉयल च्या सर्व कलाकारांचे कौतुक केले व खूप छान संकल्पना असल्याचे सांगितले. शिरीष चिटणीस यांनी देखील आपल्या शैलीमध्ये रॉयलच्या कलाकारांचे प्रोत्साहन वाढवले. ह्या कार्यक्रमाचा चौथा भाग हा १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० ह्या वेळेत होणार असून हा कार्यक्रम महान गायिका आशा भोसले यांच्या निवडक गाण्यांवर आधारित आहे. हा कार्यक्रम रॉयल परिवाराच्या सौ. अपर्णा गायकवाड ह्या सादर करणार आहेत. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी ह्या कार्यक्रमाला ५.३० ते ८.३० ह्या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे उपस्थित राहून राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इव्हेंट्सतर्फे करण्यात येत आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!