जर्मनीमध्ये पीएचडी करणार अबोली वारूंजीकर


सातारा
सातारा येथील मायक्रोबाॅयाॅलाॅजी अभ्यासक अबोली श्रीकांत वारूंजीकर आता जर्मनीतील हेल्महोल्ट्झ, म्युनिक येथील संस्थेत संशोधन प्रकल्पावर पीएचडीसाठी संशोधन करणार आहे.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज येथे मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी, तर पुण्याच्याच पाषाणमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या अबोलीने बंगलोरच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स रिसर्च सेंटरमध्ये दोन वर्ष विषाणू शास्त्रावर संशोधनाचे काम केले. हेल्महोल्ट्झ ही जर्मन अग्रगण्य संशोधन संस्था असून ही संस्था रोगमुक्त जगाची निर्मितीसाठी संशोधन करत आहे, जिथे रोग प्रकट होण्याआधीच शोधले जातात. असे जग जिथे वैयक्तिक आरोग्य धोके लवकर ओळखले जातात. हेल्महोल्ट्झ म्युनिक, जर्मनीत ती नेमके हेच काम करणार आहे. तेथे लठ्ठपणा तसेच मधुमेह प्रतिबंध आणि थेरपीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण नवकल्पना उदयास येत आहेत.अबोली याच क्षेत्रात काम करणार आहे.
सेवानिवृत्त मत्स्य व्यवसाय सहआयुक्त श्रीकांत वारूंजीकर यांची अबोली ही कन्या असून भगिनी मधुश्रीच्या नाॅर्वेतील सागरी संशोधनातील पी एच डी नंतर अबोलीही उच्च शिक्षणासाठी सज्ज आहे. यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून अबोलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!