नाना पटोलेंच्या कारचा अपघात


ट्रकची जोरदार धडक, घातपाताचा आरोप

Advertisement

नागपूर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली.सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाना पटोले हे या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धडक दिली असा गंभीर आरोप अपघातानंतर नाना पटोले यांनी केला आहे. आम्ही तर यातून बचावलो, सुखरूप राहिलो पण गाडीचं बरंच नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये असे पटोले यांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात म्हणजे घातपात होता की काय याचाही पोलिस तपास करतील असेही पटोले यांनी नमूद केले आहे.
दरम्यान या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवालच लोंढे यांनी नाना पटोलेंच्या अपघातानंतर विचारला आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!