सातारा नगर वाचनालयात भाषाविषयक ग्रंथांचे प्रदर्शन


महाराष्ट्र शासन वाचन संकल्प उपक्रमांतर्गत कार्यक्रम

Advertisement

सातारा
महाराष्ट्र शासन वाचन संकल्प या उपक्रमांतर्गत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय तर्फे भाषाविषयक ग्रंथांचे प्रदर्शन सातारा आकाशवाणीचे केंद्रप्रमुख श्री सचिन प्रभुणे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस उपस्थित होते .
यावेळी सचिन प्रभुणे म्हणाले नगर वाचनालयाचा हा उपक्रम स्तुत्य आहे वाचक वर्गामध्ये तरुण वाचकांची संख्या वाढणे गरजेचे आहे त्यासाठी ही वेगळे प्रयत्न अपेक्षित आहेत तरुण वर्ग ग्रंथालयाकडे वळला पाहिजे त्यासाठी तशा पद्धतीचे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे वाचनाचे महत्त्व हे अनन्य साधारण असून आयुष्य समृद्ध होण्यासाठी वाचन हा महत्त्वाचा घटक आहे. संदर्भग्रंथ ही संपत्ती आहे .
शिरीष चिटणीस म्हणाले नगरवाचनालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत संदर्भाच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहेत त्याचे जतन करणे गरजेचे आहे
नवीन अभ्यासकांना हे वाचनालय उपयोगी ठरणारे आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषा टिकण्यासाठी या ग्रंथांचे जतन डिजिटल पद्धतीने जतन होणे गरजेचे आहे .
प्रास्ताविक करताना डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले नगर वाचनालयाने जुने दुर्मिळ ग्रंथ डिजिटलायझेशन करण्याची प्रोसेस चालू केली आहे जवळपास साडेतीनशे ते चारशे ग्रंथ स्कॅन करून संग्रहित केले आहेत मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर बोलीभाषा आणि जुनं संदर्भ साहित्य हे पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं आहे.
कवी प्रदीप कांबळे यांनी आभार व्यक्त करताना या नगर वाचनालयात मान्यवर साहित्यिक यांनी उपस्थिती लावून हे ग्रंथालय समृद्ध केले आहे त्याचबरोबर येथील ग्रंथ हे सातत्याने वाचकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले आहे असे मत व्यक्त केले
संचालक डॉक्टर श्याम बडवे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले .
अन्वेषा कलेढोणकर यांनी सूत्रसंचालन केले
या कार्यक्रमात पत्रकार अनिल वीर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला गेला कार्यक्रमाला प्राचार्य वि ना लांडगे आनंद ननावरे ,गौतम भोसले ,ग्रंथपाल रूपा मुळे,विष्णू धावडे उल्का शिंदे ,वेदांत कारवे आणि मान्यवर वाचकांची उपस्थिती होती .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!