लोकमान्य सॊसायटीतर्फे कर्तृत्ववान महिलांचे सत्कार
जागतिक महिलादिनानिमित विशेष उपक्रम
सातारा
देवी चौक सातारा येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी तर्फे जागतीक महिलादिनाचे औचित्य साधून साताऱ्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे सत्कार सातारा जिल्हा संस्कारभारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर ह्यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी डॉक्टर सिद्धी मोरे, फिटनेस ट्रेनर वैशाली साळुंखे,अभिनेत्री विद्या विक्रम, शिक्षका श्रुती जोशी, गृह उद्योजिका स्वाती मुळे, चंद्रिका पवार, डॉक्टर अनुजा जगताप,स्मिता खरात यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
.प्रमुख पाहुणे ह्या नात्याने दिलीप चरेगावकर म्हणाले,”लोकमान्य मल्टिपर्पज ही संस्था अनेक क्षेत्रातील गुणवंताचे नेहमीच कौतुक करते,संस्थापक किरण ठाकूर यांचे ग्राहकांच्या हिताकडे व समाजातील प्रत्येक घटकांकडे जातीने लक्ष असते. आज कर्तृत्ववान महिलांचे सत्कार करून संस्था महिलांप्रति आपली बांधीलकी जपते आहे
कार्यक्रमाला संजय कोते ,लालासाहेब पडवळ ,कल्पना पडवळ ,उर्मिला चव्हाण, स्मिता मोरे, वैशाली झाड, मेंढे साहेब , मदन जाधव ,विशाल मोहिते ,प्रतीक निकम ,सोनाली शेलार ,रवी मोरे ,कुणाल कुंभार उपस्थित होते
फोटो ओळ
कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करताना दिलीप चरेगावकर

