संगीतकला व्यक्तिला आनंददायी परिपूर्ण जीवन देते
गुलदस्ता सदाबहार गीतांच्या मैफिलीत काका पाटील यांचे उद्गार
सातारा
संगीत ही एक कला असून ती प्रत्येकाने आत्मसात करावी तसेच त्यासाठी साधना करावी संगीतकला व्यक्तिला आनंददायी परिपूर्ण जीवन देते असे प्रतिपादन काका पाटील यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित गुलदस्ता या रंगारंग सदाबहार हिंदी व मराठी गीतांच्या मैफिलीत केले .
सदर कार्यक्रमास डॉ.कामिनी पाटील, सुरेखा शेजवळ, काका पाटील, शिरीष चिटणीस अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर, विजय साबळे, डॉ. सुनील पटवर्धन आदि मान्यवर उपस्थित होते.
काका पाटील म्हणाले गुलदस्ता या मैफिली मध्ये प्रत्येक गायक कलाकाराने उत्कृष्ट गायन केले आहे. या क्लबच्या सीनियर गायकांनी तर अप्रतिम गाणी गायली असून नवोदित कलाकारांनी सुद्धा आपल्या प्रतिभेची छाप रसिक श्रोत्यांच्या मनावर पाडली आहे. याचे सर्व श्रेय विजय साबळे यांना जात असून ते प्रत्येक गायक कलाकाराला सूट होईल असेच गाणे गायचा सल्ला देतात. या ग्रुपमध्ये सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आपल्या गाण्याची कला जोपासण्यासाठी येत असतात.
शिरीष चिटणीस नेहमीच अशा गीत मैफिलीस मोलाचे सहकार्य देत असतात त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या सहकार्यामुळेच सातारची संस्कृती वारसा जपण्याचा प्रयत्न होत आहे.असे म्हणाले.
शिरीष चिटणीस म्हणाले सध्या देशामध्ये कराओके चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांसाठी होत असून त्यातून समाजाला प्रेरणा व दिशा देण्याचे काम अविरत चालू आहे. संगीत जीवनाचा अविभाज्य घटक आहे.जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते व एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते
सदर प्रसंगी
अनिल वाळिंबे म्हणाले जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी होतो तसेच मन प्रसन्न राहते आजही अनेक जुने गीते रसिक श्रोत्यांना भुरळ घालतात. यावेळी विजय साबळे यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या गुलदस्ता कार्यक्रमाचे दीपप्रजनन करून उद्घाटन डॉ कामिनी पाटील,सुरेखा शेजवळ,काका पाटील,रमेश वेलणकर,विजय साबळे, अनिल वाळिंबे ,शिरीष चिटणीस,डॉ सुनील पटवर्धन आदी मान्यवरांचे हस्ते झाले.या गीत मैफिलीमध्ये हिंदी व मराठी प्रेम गीत, विरह गीत, सोलो गीत, ड्युएट गीत, गझल,फर्माईश, तसेच इतर गीत प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
गुलदस्ता या कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा पोतनीस यांच्या “आपकी नजरोने समझा या सुमधुर गीताने झाली यानंतर मैफिली मध्ये
मिलिंद हर्षे उमाकांत पाटील नागेंद्र पाटील यांचे चंद्रशेखर बोकील शुभांगी मुरुडकर डॉ. सुनील पटवर्धन वनिता कुंभार मंजिरी दीक्षित विजय साबळे व सुषमा बगाडे ऐश्वर्या गव्हाणे यांनी गाणी सादर केली
या कार्यक्रमाचा शेवट विजय साबळे यांच्या मनमोहक ” भुली हुई यादो मुझे इतना ना सताओ ” या गीताने झाला.
या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन विजय साबळे यांनी केले असून कार्यक्रमास अक्षता शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभली होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले असून कार्यक्रमाचे निवेदन
बापूलाल सुतार यांनी केले व आग्नेश शिंदे यांनी आभार मानले.