टेम्पो ट्रॅव्हल्सला आग,चौघांचा मृत्यू


पुण्यातील हिंजवडी परिसरातीळ घटना
पुणे
पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.चौघेही कंपनीचे कर्मचारी होते.व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोतून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्याने चार कर्मचारी आगीत होरपळले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी या घटनेबाबत सांगितलं की, वाहनांची तपासणी करणे त्यांचा मेंटेनन्स करणे हे नियम आहेत. ज्या कंपनीच्या बसेस आहेत, त्या बसेससाठी काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. ही जी घटना घडलेली आहे ही शॉर्टसर्किटमुळे घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली आणि यामध्ये ड्रायव्हरचा पाय देखील भाजला गेला. ड्रायव्हरने गाडीतून उडी मारली. पुढे जाऊन गाडी डिव्हायडरला आदळली, आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने पुढच्या लोकांना उतरणं शक्य होतं ते उतरले. पण, शेवटचे जे चार लोक होते, त्यांना उतरता आलं नाही. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे
गाडीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींबाबतचा तपास सुरू आहे. तपासासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. आरटीओचे ऑफिसर्स बोलवण्यात आलेले आहेत. फॉरेन्सिक टीम देखील अचानक कशी लागली याचा तपास करत आहे,

मृतांची नावे सुभाष भोसले, वय 42 शंकर शिंदे, वय 60 गुरुदास लोकरे, वय 40 राजू चव्हाण, वय 40, सर्व राहणार पुणे

जखमी झालेल्यांची नावे प्रदीप राऊत प्रवीण निकम चंद्रकांत मलजीत संदीप शिंदे विश्वनाथ झोरी जनार्दन हंबारिडकर – टेम्पो चालक

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!