चालक वाहक महिलांचा सत्कार


भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा उपक्रम
सातारा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सातारा एसटी महामंडळातील वेगळ्या क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने आपला झेंडा रोवणाऱ्या चालक वाहक महिलांचा आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे श्रीफळ, ओटी व गुलाबाचे झाड देऊन सत्कार केला. यावेळेस सातारा एसटी महामंडळातील पहिली महिला वाहक चालक सुरेखा ताई मोरे व वाहक प्रियतमा कदम पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या महिला सन्मान सोहळ्यात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेणू येळगावकर ,सातारा जिल्हा महामंत्री मनीषा पांडे ,बेटी बचाव बेटी पढाव जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, पंचायत राज अध्यक्ष चित्रा माने ,विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष उर्मिलाताई पवार ,वंडर सायन्सच्या डायरेक्टर डॉक्टर खुशी जोशी ,ऊर्जा फाउंडेशनच्या महिला संयोजक अपर्णा कुलकर्णी संस्कृत भारतीच्या ममता जोशी , विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते लता सारडा,दुर्गा वाहिनीच्या सदस्य वैष्णवी ताटे या मान्यवर महिला उपस्थित होत्या तसेच एसटी महामंडळातील इतर पदांवर कार्यरत असलेल्या महिलाही यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन भाजप जिल्हा महामंत्री मनिषाताई पांडे यांनी केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!