मी अनुभवलेला महाकुंभ या विषयावर लेख स्पर्धा
लेख पाठवण्याची अंतिम मुदत २५ मार्च
पुणे
विश्व संवाद केंद्र यांनी मी अनुभवलेला महाकुंभ या विषयावर लेखन स्पर्धा आयोजित केली आहे
महाकुंभवरील लेखासाठी विषय असे आहेत • पर्यावरण आणि महाकुंभ • सामाजिक सुरक्षा आणि महाकुंभ • महाकुंभ व्यवस्थापन • सामाजिक समरसता आणि महाकुंभ • आपल्या परंपरा – आध्यात्मिक महत्त्व आणि महाकुंभ • महाकुंभ आणि नागरिकांमधील जागृती • महाकुंभ – आर्थिक उलाढालीचे केंद्र • महाकुंभ आणि खगोलीय महत्त्व • आध्यात्मिक पर्यटन आणि महाकुंभ• हिंदू एकतेचा सहभाग आणि महाकुंभ • आंतरराष्ट्रीय पातळीवरील दाखल – महाकुंभ • महाकुंभात परदेशी नागरिकांचा सहभाग
केवळ पश्चिम महाराष्ट्रात निवास असलेल्या (पुणे , सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , अहिल्यानगर , नाशिक तसेच येथील जिल्हा व तालुका स्तर) तसेच प्रयागराज येथे महाकुंभाला जाऊन आलेल्या व्यक्तीच या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. दोन वयोगटांसाठी ही स्पर्धा आहे.गट -१: ५० वर्षाच्या आत गट – २: ५० वर्ष व त्यापुढील
वर दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर लेख लिहावा. लेख मराठी , हिंदी अथवा इंग्रजी भाषेत चालेल शब्दमर्यादा: १००० शब्द आहे लेख लिहिलेल्या फाईलमध्ये लेखाचे सुरुवातीला लेखाचे शीर्षक, स्पर्धेसाठीचा वयोगट, लेखकाचे नाव आणि जिल्हा दिलेले असावे. लेख २५ मार्च पर्यंत सोबतच्या ईमेलवर वर्ड फाईल किंवा ओपन स्वरूपात टेक्स्ट पाठवावे.
ईमेल – vskpunemahakumbh@gmail.com
स्पर्धेतील सहभाग नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन १८ मार्च पर्यंत करावे लागणार आहे हाताने लिहिलेले लेख स्वीकारले जाणार नाहीत. शुद्धलेखन पाहिले जाईल.
प्रत्येक गटात तीन विजेते क्रमांक काढले जातील.
प्रथम क्रमांक: रु १०००/-
द्वितीय क्रमांक: रु ७५०/-
तृतिय क्रमांक: रु ५००/-
स्पर्धेतील उचित लेख आयोजकांकडून विविध माध्यमांत प्रसिद्ध करण्यात येतील. स्पर्धेला दिलेले लेख इतरत्र प्रसिद्ध करू नये.पूर्व प्रसिद्ध लेख पाठवू नये. स्पर्धा झाल्यावर सुद्धा विश्व संवाद केंद्राच्या पूर्व परवानगीशिवाय कुठेही लेख प्रसिद्धीला देता येणार नाहीत.
अधिक माहितीसाठी संपर्क – 9270098267
वेळ दु. १२ ते ३

