साताऱ्यात शनिवारी सुरसंगम सदाबहार नगमे कार्यक्रम


गायक किरण अडागळे,मूर्तीकार धनंजय शिंदे यांचा सत्कार

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सभागृहामध्ये सुरसंगम सदाबहार नगमे हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जोशी, काका पाटील, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार असून सुरसंगमचे गायक कलाकार यशेंद्र क्षीरसागर, मीना गोंदकर, सुनील धनावडे, साधना धनावडे, नसीर पालकर, शरीफ सलाते, बडे भाई, युनुस भाई हे कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत. वाई येथे साठे मंगल कार्यालयात झालेल्या वाई नगरीचा आवाज सुपरसिगिंग कराओके गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक साताऱ्याच्या प्रसिद्ध गायक किरण अडागळे याने पटकावला.पुछो ना कैसे मैने रेन बिताई हे मन्ना डे यांचे हे गाणे सादर केले त्याचा सत्कार तसेच प्रसिद्ध मूर्तीकार धनंजय शिंदे ज्याने विठ्ठल मूर्ती हुबेहूब साकारली त्याचाही सत्कार आषाढी एकादशी निमित्त या कार्यक्रमात होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे शिरीष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!