सोमवारी मधु नेने यांचा गौरव समारंभ
पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन
सातारा
येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे समर्थ भक्त व ज्येष्ठ लेखक मधुसूदन उर्फ मधू नेने यांचा गौरव समारंभ सोमवार दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीप लक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित केला आहे मधू नेने यांचा सत्कार ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारचे उपाध्यक्ष श्रीकांत देवधर उपस्थित राहणार आहेत या समारंभाचे अध्यक्ष दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे असणार आहेत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी संस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ संदीप श्रोत्री आणि समन्वयक श्रीराम नानल यांनी केले आहे

