लग्नसराईला ५७ दिवस ब्रेक
३ मे नंतर थेट २९ जुनलाच मुहूर्त
सातारा
३ मेपासून लग्नसराईच्या धामधुमीला पुढील ५७ दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे.मे महिन्यात दोनच लग्नतिथी आहेत यात १ व २ मे या दोन तिथी आहेत.
३ मेपासून लग्नमुहूर्त नाहीत. थेट २९ जूनलाच पुढील मुहूर्त आहे.
यामुळे मतदानाच्या कालावधीत कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे, तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. राज्यात ७ व १३ मे रोजी २२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत उमेदवारांनी अनेक मंगल कार्यालयांत जाऊन लग्न सोहळ्यांना भेट दिली. उपनयन संस्कार सोहळ्यांतही हजेरी लावून अप्रत्यक्ष प्रचार करीत संधीचे सोने केले.
