कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा कोण करणार?


दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात असल्याने पेच

Advertisement

पंढरपूर
कार्तिकी यात्रा एकादशी सोहळा अवघ्या सात दिवसांवर आला आहे. मात्र, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.यामुळे यंदाच्या कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न होता, शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना तर कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. सध्या राज्याला देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे दोन मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. फडणवीस व अजित पवार हे दोन्ही नेते निवडणूक लढवत आहेत, अशा व्यस्त कार्यक्रमातून हे वेळ काढून पंढरपूरला येतील का ? आचारसंहिता असल्याने त्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करता येईल का ? असे प्रश्न समितीसमोर निर्माण झाले आहेत. यामुळे कार्तिकी यात्रेच्या शासकीय पूजेसंदर्भात समितीने विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. अवघ्या सात दिवसांवर कार्तिकी यात्रा आली तरी, देवाची शासकीय महापूजा कुणाच्या हस्ते करावी या संदर्भात विधि व न्याय विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही. यामुळे ऐन वेळेस अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा करावी लागणार असे चित्र निर्माण झाले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!