शुक्रवारी साताऱ्यात आर. डी बर्मन यांच्या गीतांचा कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि गीत गाता चल कराओके ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १४ रोजी आर. डी. बर्मन यांच्या हिट गीतांचा कार्यक्रम दीपलक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात साताऱ्यातील हरहुन्नरी असे ३० कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम हा अत्याधुनिक अशा डिजिटल साऊंड सिस्टमवर सादर होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना ग्रुपचे संस्थापक संजय मानके यांची असून निर्मिती ही प्रशांत कुलकर्णी यांची आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अशोक पाटील, दीपलक्ष्मीचे शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना मोफत असून सातारकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे

