बोराडेंना नगर वाचनालयाचे अभिवादन


शुक्रवारी वाचनालयात श्रद्धांजली आणि ग्रंथप्रदर्शन
सातारा
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा र बोराडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले . ग्रामीण साहित्य आणि साहित्य चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते . अनेक नवलेखकांना त्यांनी सतत प्रोत्साहन व प्रेरणा दिली होती . त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली . ग्रामीण भागातील भोवताल, तेथील माणसे, राजकारण समस्या यांचे चित्रण त्यांच्या साहित्यातून केले . त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची कधी न भरून येणारी हानी झाली आहे . प्राचार्य रा. र . बोराडे यांना शुक्रवार दि १४ फेब्रुवारी रोजी श्री छ . प्रतापसिंह महाराज (थो ) नगरवाचनालय सातारा तर्फे सायंकाळी साडेपाच वाजता श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे .
यावेळी त्यांच्या ग्रंथसंपदेचे प्रदर्शन वाचकासाठी उपलब्ध करणेत येणार आहे .
तरी सर्व वाचक, लेखक व सभासद यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!