यशवंतराव चव्हाण क्रिकेट अकादमीला श्यामसुंदरी चषक
अंतिम सामन्यात सदर बझार क्रिकेट अकादमी संघावर मात
सातारा
सातारा जिल्हा क्रिकेट असो.आणि श्यामसुंदरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 16 वर्षाखालील शामसुंदरी चषक क्रिकेट स्पर्धेत कराडच्या यशवंतराव चव्हाण क्रिकेट अकादमी संघाने सातारच्या सदर बझार क्रिकेट अकादमी संघावर16 धावांनी विजय मिळवून विजेतेपद मिळविले. येथील के.एस.डी. शानभाग स्कूलच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात कराड संघाने 20 षटकात 3 बाद 152 धावा केल्या.सुयश पडालने 55 चेंडूत 13 चौकार मारून नाबाद 84 धावांची झंझावाती खेळी केली.कर्णधार अर्थ पाटीलने 32 धावांची दमदार खेळी केली.ओंकार आणि शंतनु यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सदर बझार अकादमी संघाने 20 षटकात 8 बाद 136 धावा केल्या.इंद्रनील जाधव 26,अंकुर जाधव 23 यांनी दमदार खेळी केली.नंतर शंतनुने 27 चेंडूत 46 धावा केल्या.तो बाद झाला आणि संघाचा डाव 8 बाद 136 धावांवर आटोपला.कराडच्या फराहन मुल्ला,संतोष कोळी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
क्रीडा संघटक रमेश शानभाग,उद्योजक रवी खत्री,क्रिकेटपटू दीपक पाटील,पत्रकार शरद महाजनी,हेमंत गुजर, सदानंद प्रधान, राजू जाधव, इर्शाद बागवान, प्रशांत पवार,धनंजय जाधव, उमेश वेलणकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.मालिकावीर सईश बारटक्के,उत्कृष्ट फलंदाज प्रथमेश दंडवते,गोलंदाज फरहान मुल्ला, क्षेत्ररक्षक यश शिलवंत यांना चषक देऊन गौरवण्यात आले