वाढेफाटा चौकात भला मोठा खड्डा


अपघाताला निमंत्रण,प्रशासनाचे दुर्लक्ष
सातारा
सातारा बेंगलोर महामार्गावरील वाढे फाटा चौकात रस्त्यालगतच्या खोदलेला भला मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे गेले कित्येक महिन्यापासून हा खड्डा ड्रेनेज सफाईसाठी खोदला होता परंतु हा खड्डा सध्या मानवी जिवितासाठी धोक्याचा ठरत आहे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी संख्या असून रस्त्यालगतच हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे विशेषता रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहन चालकांना दिसून येत नाही पडलेल्या खड्ड्यामुळे परिसरात अनेकदा वाहतुकीची कोंडी होत आहे त्यातच रस्त्यालगतच भाजी मंडई भरत असल्याने वाहन चालकांना या मार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे पडलेला खड्डा त्वरित मुजविण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे .
वाढे फाटा चौकात चौहूबाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते या ठिकाणी पडलेला मोठा खड्डा धोक्याचा ठरत आहे सुरक्षितेचे येथे कोणतीच उपाययोजना केलेली नाही भला मोठा खड्ड्यात साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरत आहे अशी माहिती श्रीरंग काटेकर यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!