बीबीए बीसीए सीईटी फाॅर्म भरण्याची अंतिम तारीख १० फेब्रूवारी


सातारा
बीबीए आणि बीसीएच्या प्रवेशासाठी डीटीईची ऑनलाईन सीईटी प्रवेश परिक्षा द्यावी लागते. सदर सीईटी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र होतो. बीबीए आणि बीसीए प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ ही आहे. तरी बीबीए, बीसीए करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावेत अशी माहिती शिवाजी युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब सावंत, उपाध्यक्षा डॉ. स्वेता मेथा, सचिव डॉ. प्रविण जाधव, खजानिस डॉ. रंजना शिंदे आणि निमंत्रक डॉ. सारंग भोला यांनी दिली.

Advertisement

यावर्षीची बीसीए बीबीए प्रवेश परिक्षा २९, ३० एप्रिल आणि २ मे २०२५ रोजी होणार आहे. या परिक्षेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी २०२५ ही आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश परिक्षेचे अर्ज www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन भरावेत. कारण या प्रवेश परिक्षा दिल्या तरच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींसाठी विदयार्थी पात्र ठरतात. या परिक्षेमुळे फीमध्ये मिळणाऱ्या सवलती मिळणार आहेत तरी बीबीए, बीसीए करु इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश परिक्षा द्यावी असे आवाहन सुम्टाच्यावतीने करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!