अष्टगंधारमध्ये कुमार सानू यांची गाणी
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग सातवा दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित केला गेला. हा कार्यक्रम मेलडी किंग कुमार सानू यांच्या गाण्यांवर आधारित होता. रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे श्री. विजय आवळे यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री. सुहास पाटील, श्री सुनील राठी, तसेच दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थाचे चेअरमन मा. शिरीष चिटणीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे श्री. प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. श्री. विजय आवळे यांचे सोबत रॉयलचे इतर गायक त्यांना साथ संगत केली.
रसिक श्रोत्यांनी पाऊस असताना देखील आपली उपस्थिती दाखवून श्री विजय आवळे आणि इतर गायक कलाकारांना भरभरून कौतुक आणि प्रोत्साहन दिले.

