सैफ अली खानवर चाकू हल्ला


अज्ञाताने घरात घुसून केले वार,सैफ रुग्णालयात दाखल

मुंबई-
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरातच चाकू हल्ला झाला त्याच्यावर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री १० वाजता हि घटना घडली
सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला पण त्याची चाहूल लागल्यामुळे घरामध्ये आरडा ओरड सुरू झाली. सैफ रात्री झोपला असताना अचानक आवाज झाल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिलं. तेव्हा चोर आणि सैफ अली खान एकमेकांच्या समोरासमोर आले. त्याचवेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने वार केले. हा प्रकार रात्री अडीचच्या सुमारास घडला. त्यानंतर जखमी झालेल्या सैफला ताबडतोब मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ जखमी झाल्यामुळे त्याला सावरण्यासाठी घरात धावपळ सुरू झाली या संधीचा फायदा घेत चोराने घरातून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्यात खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफच्या मुलांच्या नॅनीला झाली त्यामुळे तिन लगेचेच आरडाओरड सुरू केली. तेव्हा सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्याक्षणी चोर आणि सैफ आमनेसामने आले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली.

Advertisement

सैफच्या मानेला १० सेंटीमीटरची जखम झाली आहे. तसेच त्याच्या हातावर आणि पाठीवर सुद्धा वार करण्यात आल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. अद्याप अभिनेत्याच्या कुटुंबियांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!