भ्रष्टाचार बंद होईल त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले असे समजू: डॉ. हिम्मतराव बावस्कर
अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार प्रदान.
सातारा
आज देशातील भ्रष्टाचार निर्मूलन होणे गरजेचे आहे ,कारण या भ्रष्टाचारामुळेच देशाची प्रगती खुंटत आहे .ज्या दिवशी भ्रष्टाचार बंद होईल त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले असे समजू असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी केले .
अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टने माननीय पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना त्यांच्या सार्वजनिक आरोग्य व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन २०२३ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविले.यावेळी बोलताना डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी वरील उद्गार काढले
डॉ. हिम्मतराव बावस्कर म्हणाले,आज हा पुरस्कार मी स्वीकारताना पहावयास माझी आई हवी होती ,कारण मी संशोधन करत असताना ती नेहमी मला म्हणायची की तू हे जे काम करतोय, पण तुला कोण पुरस्कार देणार ? ज्या वेळेला पद्मश्री पुरस्कार सरकारने दिला, त्यावेळीही ती खरोखर हवी होती .
आपले जे कर्तव्य पार पाडा वागण्यात प्रामाणिकपणा ठेवा नीतिमत्ता राखली तरच यश तुमचे आहे.दुसऱ्याचा चेहर्यावर आनंद ठेवा,समाजासाठी काम करा,असे मार्गदर्शनही त्यांनी केले
डॉ. बावस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम सातारा येथील डाॅ.धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात, जेष्ठ डॉ. शरद अभ्यंकर यांच्या हस्ते व कर्मवीर भाऊराव पाटील यूनिवर्सिटी, साताराचे व्हाईस चान्सेलर डॉ..ज्ञानदेव म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली झाला यावेळी रयत शिक्षण संस्था, साताराचे संघटक डाॅ.अनिल पाटील,डाॅ.सौ.प्रमोदिनी बावस्कर ,चिरमुले ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी,डी.जी.काॅमर्स काॅलेज चे प्राचार्य डाॅ.गणेश जाधव यांची उपस्थिती होती .
या कार्यक्रमात ट्रस्टची ओळख करून देताना दिलीप पाठक यांनी स्व. अण्णासाहेब चिरमुले यांच्या द्रष्टेपणाची ओळख करून दिली.
प्रास्ताविक भाषणात डाॅ.अच्युत गोडबोले म्हणाले की, पद्मश्री पुरस्कार विजेत्या डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्या कार्याची ओळख संपूर्ण देशातच नव्हे तर जगात झाल्यानंतर त्यांच्या कार्याची माहिती कळली आज ट्रस्टच्या वतीने त्यांना गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे .
.डाॅ.सौ.प्रमोदिनी बावस्कर यांचा सत्कार साडी देऊन डाॅ.सौ.अनुराधा गोडबोले यांनी केला.यावेळी समस्त सातारकरांचे वतीने कंदी पेढ्यांचा हार घालून डाॅ.बावस्कर यांचा सत्कार केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला प्रदान करण्याचा हा कार्यक्रम हा खरोखरच आदर्श असा होत आहे , चिरमुले ट्रस्टचे कार्य हे दिवसेंदिवस वृद्धींगत होत असून या कार्यात रयत शिक्षण संस्था विविध प्रकारे सहभागी होत आहे, याचा आनंद वाटतो असे सांगितले.डाॅ.बावस्कर यांनी नावाप्रमाणेच हिंमत दाखवून कार्य केले.त्यांची पुरस्कारासाठीची निवड अगदी सार्थ असल्याचे सांगितले.
चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस मधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपकरणे खरेदीसाठी 25 हजार रुपयांचा देणगीचा धनादेश विश्वस्त समीर जोशी यांनी यावेळी संघटक डॉ.अनिल पाटील यांच्याकडे वितरित केला .
जेष्ठ धन्वंतरी डॉ.शरद अभ्यंकर यांनी ,डॉ.बावस्कर यांचा मी स्वतः चाहता असून ते एक रोल मॉडेल आहेत कोकणात स्वतःला संशोधनात वाहून घेऊन डॉ.बावस्करांनी अतिशय खूप मोठी गोष्ट करून दाखवली.आज त्यांचे काम हे सूर्याच्या रथासारखे आहे साधनांवर अवलंबून राहता त्यांनी गुणांवर करून दाखवलेले हे कार्य खरोखरच गौरव पूर्ण असे आहे.
सत्कार प्रसंगी पिंपरी – चिंचवडचे काटे ,मानकर, धन्वंतरी पतसंस्थेचे वतीने डाॅ.रवींद्र भोसले, सातारा जिल्हा फिजिशियन असोसिएशनच्या डाॅ.शैलजा कापरे आदींनी डॉ. बावस्कर यांचा विशेष सत्कार केला.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टच्या व्यवस्थापिका सौ.मानसी माचवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीर जोशी यांनी केले .
कार्यक्रमास अनिल काटदरे,डाॅ.संदिप श्रोत्री,डाॅ.प्रसन्न दाभोलकर,डाॅ.संजय क्षीरसागर, अशोक गोडबोले,अविनाश लेवे,रमण वेलणकर,डाॅ.सावंत,सौ.अभ्यंकर,डाॅ.सौ.अनुराधा गोडबोले,डाॅ.सौ. शैलजा कापरे,राजेंद्र शेलार,बाबुराव शिंदे,आयएम ए चे प्रतिनिधी,या कार्यक्रमास उपस्थित होते.
फोटो ओळी
विमा महर्षी अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार पद्मश्री डाॅ.हिम्मतराव बावस्कर यांना प्रदान करताना डाॅ.शरद अभ्यंकर शेजारी डाॅ.अच्युत गोडबोले,डाॅ.सौ.प्रमोदिनी बावस्कर,डाॅ.ज्ञानदेव मस्के, समीर जोशी, दिलीप पाठक. छाया अतुल देशपांडे ,सातारा.

