रुपाली गांगुली भाजपमध्ये
अनुपमा फेम अभिनेत्रीने हाती धरले कमल
नवी दिल्ली
अनुपमा फेम अभिनेत्री रूपाली गांगुलीने आज विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.रूपाली गांगुलीसोबत अमेय जोशी यांनीही आज भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रूपाली गांगुली राजकारणात उतरली आहे. रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे. स्टार प्लसवरील ही मालिका सध्या खूप चर्चेमध्ये आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीचं वार वाहत आहे.
पक्षप्रवेश झाल्यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांची मी मोठी चाहती आहे. विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही यात सहभागी असलं पाहिजे, असं वाटतं. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया रूपाली गांगुलीने व्यक्त केली आहे.
