धावपटू जान्हवी निकमला नंदा जाधव पुरस्कार
सातारा
आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा नंदा जाधव स्मृती पुरस्कार यावर्षी धावपटू जान्हवी निकम हिला देण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव व उपाध्यक्ष श्री टी आर गारळे यांनी दिली.
26 ऑक्टोबर 25 रोजी नंदाच्या 26 व्या स्मृतीदिना प्रित्यर्थ रक्तदान शिबीर ही आयोजित करण्यात येणार असून सकाळी 9.30 वा. शिबिराचे उदघाटन व पुरस्कार वितरण समारंभ गणेश मंदिर हॉल, सत्वशीलनगर, सातारा याठिकाणी करण्यात येणार आहे.
जान्हवी निकम हिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तर 400मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला सर्व क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव श्री सुरेश साधले यांनी केले आहे.

