सूरसंगम मैफलीस सातारकरांचा प्रतिसाद


सातारा
येथील सूरसंगम संगीत ग्रुपतर्फे आयोजित बहारदार गाण्यांच्या मैफलीस सातारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला जुन्या नव्या मराठी हिंदी गीतांची सुरम्य संध्याकाळ रसिकांनी अनुभवली. चित्रपट गीतांपासून भक्तीगीतांपर्यंत आणि सामाजिक गीतांपासून ते प्रेम गीतांपर्यंत अशा सर्व प्रकारच्या गीतांचे सादरीकरण झाले .शहाबुद्दीन भाई शेख यांनी हे आयोजन केले होते तर युनूसभाई शेख यांनी संगीत संयोजन केले. ही मैफल येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये झाली .यासाठी महाविद्यालयाचे सर्वेसर्वा जयेंद्र चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मैफलीमध्ये युनूसभाई शेख, यशेंद्र क्षीरसागर ,बाळासाहेब पाटील, स्वाती शेडगे, डी पी बारटक्के, मधुकर शेंबडे, सुरेश जगताप, पल्लवी शहा, सुनील राठी, सोहेल शेख या गायकांनी बहारदार गीते पेश केली. “कानडा राजा पंढरीचा”, तुमच आमचं जमलं चित्रपटातील “चल रे वाघ्या रडू नको” या श्री. क्षीरसागर यांनी सादर केलेल्या वेगळ्या गीतांनी रसिकांची मने जिंकली. बाळासाहेब पाटील यांचे मितवा हे गीत रसिकांना भावले. स्वाती शेडगे यांचे मेरी जंग चित्रपटातील गीत रसिकांना जिंकून गेले .सोहेल शेख यांनी दिल, तसेच हम दिल दे चुके सनम चित्रपटातील गीतांनी रसिकांचे मन मोहून टाकले. मान वेळावूनी हे गीत डॉक्टर बारटक्के यांनी सादर केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. सुनील राठी यांनी बार बार देखो सारखी बहारदार गीते पेश केली. युनुस भाई शेख यांनी श्री क्षीरसागर यांच्या समवेत जानू मेरी जान हे गीत सुंदर रीतीने पेश केले. तर पल्लवी शहा यांनी जखम चित्रपटातील गली मे आज चांद निकला हे गीत खूप सुंदर पद्धतीने पेश केले. मधुकर शेंबडे यांच्या स्वर्गीय मनोज कुमार यांच्या तोबा यह मतवाली चाल गीतावर रसिकांनी छान प्रतिक्रिया दिल्या .ही संगीत मैफल मोफत होती . सुरुवातीला सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी अनोखी संगीत प्रतिज्ञा घे तली. या कार्यक्रमाला विविध संगीत समुदायांचे गायक, गायिका तसेच रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Advertisement

फोटो ओळ
कानडा राजा पंढरीचा हे भक्तीगीत सादर करताना यशेंद्र क्षीरसागर.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!