ग्रंथदिंडीतून झाले भारतीय संस्कृतीचे दर्शन
24व्या ग्रंथ महोत्सवाची शानदार सुरुवात
सातारा
24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाची शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात झाली .सातारा शहरातल्या विविध शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये काढलेल्या चित्ररथातून भारतीय संस्कृतीचे मनोहारी दर्शन झाले .या ग्रंथ दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . दिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाहक शिरीष चिटणीस , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य व शाहूपुरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी , दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे , डॉ संदीप श्रोत्री , माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम ,सहकोषाध्यक्ष प्रदीप कांबळे ,सहसमन्वयक सुनिता कदम , सहसमन्वयक प्रल्हाद पार्टे , प्रमोदिनी मंडपे ,,माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम तसेच विविध मान्यवर उपस्थित होते
या ग्रंथ दिंडीची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली आकर्षक रित्या फुलांनी सजवलेल्या ग्रंथ दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा तसेच ग्रंथ आकर्षक पद्धतीने ठेवण्यात आले होते या ग्रंथ दिंडीला पोलीस अधीक्षक समीर शेख व ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी खांदा दिला या ग्रंथदिंडीला व ग्रंथमहोत्सवाच्या आगामी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .यसकाळच्या थंडगार हवेत आणि उत्साह पूर्ण वातावरणामध्ये ग्रंथ दिंडीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ग्रंथ दिंडी गांधी मैदान राजवाडा येथून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीकडे रवाना झाली .या ग्रंथ महोत्सव दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .छत्रपती शिवराय आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ , लिहिते व साक्षर व्हा , वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ,तसेच मराठी भाषाअभिजात दर्जा , अशा विविध विषयांवर वेगवेगळ्या शाळांनी आकर्षक चित्ररथ सादर केले .या चित्ररथांमधून मुलांची सामाजिक विषयांविषयी असणारी संवेदना दिसून आली ग्रंथदिंडी अत्यंत शिस्तबद्ध रित्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कडे मार्गस्थ झाली अर्ध्या तासाच्या श्रम परिहारानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले