ग्रंथ महोत्सवामध्ये शनिवारी विविध कार्यक्रम
परिसंवाद,कवी संमेलन आणि बरेच काही
सातारा
सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवामध्ये शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत सकाळी साडेआठ ते अकरा लहान मुलांसाठी प्रबोधनपर आणि रंजन पर कार्यक्रम सादर होणार आहे त्यामध्ये लेखिका व पत्रकार स्वाती राजे गोष्टीचे झाड या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.त्याचबरोबर गोष्टी आणि गाणी हा कार्यक्रम डॉक्टर दिलीप गरुड-कार्यवाह अमरेंद्र भास्कर बाल साहित्य संस्था पुणे सादर करणार आहेत
या कार्यक्रमात ऍड दत्ता बनकर रवींद्र खंदारे आणि तेजस गंबरे उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रमोदिनी मंडपे करणार आहेत .यानंतर दुपारीअकरा वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन आणि त्याचबरोबर सातारा मधील इतर कवींचे कवी संमेलनही होणार आहे .
यामध्ये प्रसिद्ध कवी लेखक देवा झिंझाड त्याचबरोबर कवी अनिल दीक्षित , पुण्याचे प्रसिद्ध हास्य कवी बंडा जोशी आणि माणदेशच्या कवयित्री कांता भोसले हे आपल्या कविता सादर करणार आहेत .या कार्यक्रमात सीमा मंगरुळे , प्रमोद जगताप ,नरेंद्र निकम ,सौरभ दुबे ,अनिता जाधव ,दत्तात्रय पांढरे ,डॉक्टर शुभांगी कुंभार ,हेमा जाधव ,सिद्धनाथ वावरे ,वसुंधरा निकम ,क्रांती राणे-पाटील या सातारा परिसरा मधील कवी त्यांच्या रचना सादर करणार आहेत .या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी प्रदीप कांबळे करणार आहेत .
कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामदास नेहुलकर एम आय मोदी उपस्थित राहणार आहेत .
ग्रंथ महोत्सवात दुपारी तीन वाजता वाढते पर्यटन,ढासळते पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार आहे .
यामध्ये वक्ते म्हणून डॉक्टर मधुकर बाचूलकर ,उमेश झिरपे ,आनंद सराफ ,संध्या चौगुले भाग घेणार आहेत .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉक्टर अविनाश ढाकणे हे भूषवणार आहेत .प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती आदिती भारद्वाज उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाचे संवाद व सूत्रसंचालन डॉक्टर संदीप श्रोत्री करणार आहेत .
संध्याकाळी साडेपाच वाजता सध्या सर्वत्र चर्चेत असणारा आणि श्रोत्यांना आवडणारा व्यक्तिचित्रावर आधारित ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने लिखित वळणावरची माणसं या अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे याचे सादरीकरण डॉक्टर आदिती काळमेख ,वैदेही कुलकर्णी ,चंद्रकांत कांबिरे करणार आहेत .या कार्यक्रमाची सूत्रसंकल्पना डॉक्टर राजेंद्र माने यांची आहे .या कार्यक्रमात प्राचार्य राजेंद्र शेजवळ व चपराक प्रकाशन चे प्रकाशक व लेखक घनश्याम पाटील उपस्थित राहणार आहेत .
सायंकाळी सात वाजता लोकरंग शाहिरीचे हा ओवी ,अभंग,भारुड ,पोवाडा या लोकसाहित्यावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे .याची संकल्पना आणि लेखन लोकसाहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे यांची आहे .याचे सादरीकरण श्री योगेश चिकटगावकर ,डॉक्टर सुखदा खांडगे आणि कलावंत करणार आहेत .ही महाराष्ट्र कला संस्कृती मंचची प्रस्तुती आहे .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट आणि जनता सहकारी बँक साताराचे चेअरमन अमोल मोहिते उपस्थित राहणार आहेत याचे संवादन शिरीष चिटणीस करणार आहेत .
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह श्री शिरीष चिटणीस अध्यक्ष डॉक्टर यशवंत पाटणे आणि ग्रंथ महोत्सव समिती यांनी केले आहे .

