ब्राह्मण महासंघाची रविवारी सातारा येथे बैठक


युवाशक्ती शाखा बांधणीसाठी नियोजन

Advertisement

सातारा
ब्राह्मण समाजातील युवक युवतींना व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने, नोकरी, व्यवसाय, विवाह यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करता येण्यासाठी अखिल ब्राह्मण महासंघाने युवाशक्ती या शाखेची बांधणी करण्याचे योजले आहे. युवाशक्ती शाखेची कार्यपद्धती ठरवणे, आणि इतर नियोजन करण्यासाठी जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 1१२ जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी, रांगोळी कॉलनी, शाहूपुरी सातारा यांचे घरी बैठक आयोजित केलेली आहे.
ब्राह्मण युवक युवतींचे संघटन उभारून त्यांच्या प्रगतीसाठी या युवाशक्ती शाखेच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार आहे. या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल ब्राह्मण महासंघ अध्यक्ष धनंजय कुलकर्ण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री महेश कुलकर्णी 9822397384, अथवा सौरभ आफळे 9689944994 यांच्याशी संपर्क साधावा..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!