सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव शुक्रवारी सुरू


सकाळी सव्वा आठ वाजता गांधी मैदान येथून ग्रंथ दिंडी
सातारा
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित 24 व्या ग्रंथ महोत्सवाला शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी प्रारंभ होत असून सकाळी सव्वा आठ वाजता गांधी मैदान येथून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार आहे यावेळी ग्रंथदिंडीचे पूजन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कदम, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमित कुलकर्णी आणि मसाप प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर आणि जेष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाहक शिरीष चिटणीस यांनी दिली
त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते व प्रसिद्ध लेखक कवी प्रवीण दवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अध्यक्षस्थानी राहणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत
हा ग्रंथ महोत्सव सातारा जिल्हा परिषद मैदानावर होणार असून तिथे 100 पेक्षा जास्त स्टॉल उभारण्यात आले आहेत सातारकर रसिक वाचकांना विविध प्रकारची पुस्तके खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे चार दिवस चालणाऱ्या ग्रंथ महोत्सवामध्ये दररोज विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ही शिरीष चिटणीस यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!