बोपदेव घाटात मुलीवर गँगरेप


अंगावर जखमा; रुग्णालयात उपचार सुरू

Advertisement

पुणे
शहरातील वानवडी परिसरात स्कूल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. बोपदेव घाटात देखील एका मुलीवरती गॅंग रेप झाल्याची घटना घडली आहे शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आलीय. मुलीवर गॅंगरेप झाल्याची माहिती समजताच गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली.
बोपदेव घाटात ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा आहेत जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.कोंडवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. २१ वर्षीय तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात बुधवारी रात्री गेली होती. तिच्यावर तिघांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बलात्कार केला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती अंधारात आणि निर्जन अशी होती. या घटनेची माहिती पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास मिळाली. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त रंजन शर्मा यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!