पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा भारतात


सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून नवी दिल्ली येथे प्रारंभ

नवी दिल्ली :
पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. या स्पर्धेत २१ देशांचे पुरुष संघ आणि २० देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

Advertisement

पुरुष संघ : भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, घाना, केनिया, दक्षिण आफ्रिका,इंग्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया
महिला संघ : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान, इराण, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, केनिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा, पोलंड, इंग्लंड, जर्मनी, पेरू, न्यूझीलंड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!