गणेशोत्सवात दररोज प्रबोधनात्मक व्याख्यान


साताऱ्यातील श्री दत्त कॉलनी गणेश मंडळाचा उपक्रम

सातारा
गणेशोत्सवात सगळीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण असते पण बऱ्याच ठिकाणी अतिउत्साह अंगावर येतो. गणेश मंडळांची दंडेली, खंडणी वसूल केल्याप्रमाणे देणगी वसूल करणे, चढाओढीने उभारलेले मंडप, अनावश्यक चकचकाट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात 11 दिवस होणारा अचकट विचकट गाण्यांचा भडीमार, आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या डी जे च्या साथीने निघणाऱ्या मिरवणूका, सगळ्या प्रकारचे भान विसरून त्यात बेहोष झालेली तरुणाई.अशा या निराशाजनक वातावरणात एक सुखद अपवाद पहायला मिळाला साताऱ्यातील अहिरे कॉलनी(देगांव रोड, कोडोली )येथे श्री दत्त कॉलनी नावाचे एक छोटे गणेश मंडळ आहे. त्याचे व्यवस्थापन यावर्षी एक शिक्षक दांपत्य स्वाती आणि गणेश माने यांच्याकडे आले. त्यांनी ठरवले. यावर्षी काहीतरी भरीव, प्रबोधनात्मक असं आपल्या सदस्यांना देण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी गणेशोत्सवाचे 11 दिवस वेगवेगळ्या विषयावरील तज्ज्ञ लोकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि कार्यकारिणी मंडळाने याला अनुमोदन दिले.

Advertisement


या स्तुत्य उपक्रमाचा श्रीगणेशा करण्याची विनंती त्यांनी डॉ. अदिती काळमेख यांना केली आणि त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. सायंकाळी आरती वगैरे आवरून आबालवृद्ध सर्व मंडळी उत्सुकतेने बसलेली होती.आरोग्य आणि पालकत्व हे डॉ. काळमेख यांचे जिव्हाळ्याचे विषय. त्या विषयावर सर्वांशी पाऊण तास त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
या उपक्रमाबद्दल बोलताना हे दांपत्य म्हणाले,”उपस्थित लोकांपैकी 2-4 जरी लोकांनी यातून काही घेतले, आपल्यात बदल केले, तरी आमची धडपड सार्थकी लागेल
पोक्सो कायदा, उद्या करिअर गाईडन्स अशी रोज वेगवेगळी वैचारिक मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या या गणेश मंडळाचा इतर सर्व मंडळांनी नक्कीच आदर्श घ्यायला हवा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!