वार्षिक राशिभविष्य 2025:कन्या


वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

कन्या
नवीन वर्ष भाग्यकारक

Advertisement

कन्या राशीच्या व्यक्तींची नवीन वर्षाची सुरुवात अतिशय उत्तम असेल हे नवीन वर्ष 2025 भाग्यकारक ठरेल अनेक लाभ होतील काही व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर मानसन्मान मिळेल धनलाभ मान सन्मान पद प्रतिष्ठा याबरोबरच खूप मोठ्या व्यक्तींशी चांगले संबंध येतील या संबंधामुळे भविष्यात तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होतील प्रॉपर्टी किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार करणाऱ्या लोकांना यावर्षी चांगला फायदा मिळेल काही लोक जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन घरात गृहप्रवेश करतील नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी सन्मानित केले जाईल कन्या राशीच्या ज्या व्यक्तींना अजून नोकरी मिळाली नाही त्यांना वर्षाच्या सुरुवातीला मनासारखी नोकरी मिळेल कौटुंबिक जीवनात जर काही ताण-तणाव असतील तर तो कमी करण्यासाठी घरातील जेष्ठ लोकांचा सल्ला घ्या प्रेम संबंधात थोडी नाराजी राहील पण मनात राग किंवा गैरसमज ठेवले तर प्रेम संबंध जास्त दिवस टिकणार नाही यावर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील मात्र पत्नीच्या किंवा जोडीदाराचे आरोग्याकडे दक्ष द्यावे लागेल 29 मार्च 2025 रोजी शनीचे गोचर तुमच्या राशीच्या सप्तम स्थानातून म्हणजे मीन राशीतून होणार आहे सप्तमभावामध्ये शनी दोषकारक असतो त्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो नियमित मिळणारी पैशाची आवक कमी होईल किंवा अनियमित होईल न्यायप्रविष्ट असलेल्या केसेस मध्ये वाद वाढू शकतो किंवा कोर्ट केस मध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागणार नाही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त तुम्हाला घरापासून लांब राहावे लागेल सप्तमभावातील शनीचे गोचर हे भागीदारी मध्ये व्यत्यय किंवा वाद आणू शकते त्यामुळे ज्या व्यक्तींचा भागीदारीत व्यवसाय आहे त्यांनी पार्टनरशी सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करावी आर्थिक बाबतीत पारदर्शिता ठेवावी 14 मे 2025 रोजी गुरु ग्रह मिथुन राशीतून गोचर करणार आहे मिथुन आणि कन्या राशीचा राशी स्वामी बुध आहे गुरु ग्रह हा बुद्धाचा नैसर्गिक शत्रू आहे त्यामुळे त्याचा जास्त फायदा होणार नाही तरीही गुरु जास्त नकारात्मक परिणाम देत नाहीत दशमस्थानातून गोचर करणारे गुरु हे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले यश देतील कौटुंबिक स्थिती मात्र सर्वसाधारण राहील कन्या राशीच्या शेतकरी वर्गाला यावर्षी चांगले कृषी उत्पादन होईल पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनातून लाभ होईल जीवनाचा स्तर उंचावेल हृदयरोग श्वसन किंवा फुफुसाचे रोग असतील तर त्यात आराम मिळेल 30 मे रोजी राहू आणि केतू से गोचर अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीतून होणार आहे हे गोचर तुमच्यासाठी शुभकारक आहे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेला पैसा मिळेल शत्रूवर विजय मिळेल मात्र आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल बाहेरचे तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नका तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे कन्या राशीसाठी एप्रिल मे आणि सप्टेंबर हे महिने आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!